'पंढरपूरची वारी'
आजच्या तरुण पिढीमध्ये पंढरपूर वारी विषयी खूप प्रेम आदर आहे आणि मनामध्ये एकदा तरी वारी करायची अशी इच्छा आहे. हजारोच्या संख्येने ही तरुण मंडळी कधी आळंदी - पुणे तर कधी पुणे - सासवड असे टप्पे करीत असते. आणि त्यानंतर ओढ लागते पूर्ण पायी वारी पंढरपूर पर्यंत करायची! पण असा अठरा एकोणीस दिवसाचा प्रवास कसा होणार? मुक्कामाची सोय काय?
खाण्यापिण्याचे कसे होईल? आपले सामान कसे काय न्यायचे? दिंडी म्हणजे काय असते? दिंडी रजिस्ट्रेशन कसे करायचे? एकंदरीत अनेक प्रश्न मनात असतात आणि त्यांची उत्तरे माहित नसल्यामुळे वारी करण्याची सुप्त इच्छा सुप्तच राहते!!अशी मंडळी जर आपणास आढळली तर त्यांना माझे हे पुस्तक पंढरपूरची वारी अवश्य भेट द्या. या पुस्तकात वारीचे संपूर्ण तयारी कशी करायची याचे संपूर्ण मार्गदर्शन केले आहे.
भेट देण्यासाठी अतिशय उपयुक्त असे हे पुस्तक. किंमत फक्त रुपये 120 आहे आणि जर आपण दहा घेतली तर दोन पुस्तके फ्री.
'पंढरपूरची वारी'
पंढरपूर वारी - लाखो अनोळखी लोकांबरोबर केलेली यात्रा. भक्तीची ज्योत प्रत्येकाच्या हृदयात प्रज्वलित होते आणि 'मी' 'तो' होतो आणि 'तो' 'मी'. इथे आपल्याला 'सोहम' चा खरा अर्थ उमगतो. वारीसोबत प्रवास करीत हे पुस्तक आपणास घेऊन जाते त्या पंढरपूरला, जे साक्षात भूवैकुंठ म्हणून ओळखले जाते. लाडक्या विठोबाचे परमधाम. या पुस्तकांबरोबरच आपण प्रवास करता, अनुभव घेत घेत, उभे रिंगण, गोल रिंगण, फुगड्या, उड्या, भजन, कीर्तन! एका मंतरलेल्या, गूढ आणि मुग्ध करणाऱ्या जगात आपले मन रमते. पुस्तक वाचता वाचता तुम्ही गर्दीमध्ये विरघळून जाता, मैलो मैल चालण्याचे श्रम पण अनुभवता, अभंग आणि टाळ मृदंगाच्या संगीतात हरवून जाता, पण आतमध्ये कुठेतरी तुम्हाला तुमचा खरा 'मी' सापडतो, जो या भौतिक जगात हरवला होता!
पंढरपुर वारीचा इतिहास, वारीची रचना, रिंगण, वारी मधील लेखकाचेअनुभव, अन्य माहिती अणि अनेक रंगीत फोटो, दिले आहेत. याशिवाय, जर आपल्याला वारी करायची असेल त्यासाठी कशी तयारी करावी याची अथपासून इती पर्यंत संपूर्ण माहिती दिली आहे.
दीपक फडणीस यांचे मूळ इंग्रजी पुस्तक 'Pandharpur Wari - A Walking Pilgrimage to Pandharpur' याचा हा मराठीतील अनुवाद आहे. अनुवादक आहेत 'श्याम नारायण पाठक'.
मूळ लेखक: दीपक फडणीस
पृष्ठ संख्या ५६, विक्रीची किंमत रुपये १२०
'पंढरपूरची वारी' हे पुस्तक आता ॲमेझॉन, बुकगंगा आणि शॉपिझेन वर उपलब्ध आहे.
Amazon link: https://amzn.to/3F96lD9
माझ्याकडुन डायरेक्ट मागवता येईल. G pay ने रुपये माझ्या मोबाईल नंबर ९९२२९०९००९ वर रुपये १२० पाठवा, नाव, पत्ता व फोन नंबर पाठवा.
No comments:
Post a Comment